श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी, नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाळे या साईभक्ताने श्री साईचरणी ६० ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत ४ लाख २९ हजार रुपये आहे.
हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. या प्रसंगी, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी श्री राघव नरसाळे यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
या वेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी आदी, उपस्थित होते.