Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थानमधील दिव्‍यांग  कर्मचा-यांना  तीनचाकी सायकल वाटप.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी तसेच प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमानाने श्री साईबाबा संस्‍थान येथे कार्यरत असणा-या दिव्‍यांग कर्मचा-यांना तीनचाकी सायकलचे आज दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल येथे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से) यांचे हस्‍ते वाटप करणेत आले.
यावेळी श्री गाडीलकर यांनी श्री साईबाबा संस्‍थान कर्मचारी यांना सायकल उपलब्‍ध करुन दिलेबद्दल प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे आभार व्‍यक्‍त केले. अशाच प्रकारच्‍या अन्‍य संस्‍थांनी पुढे येवुन येथील विविध उपक्रमामध्‍ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
यावेळी प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे पदाधिकारी श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक, उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, अधिसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी रूग्‍णालये सुरेश टोलमारे, स्‍टोअर मॅनेजर शितल कथले, बायोमेडीकल वेस्‍ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळकेर, यांचेसह कपिल बालोटे, सुरेंद्रकुमार पांडे तसेच श्री साईबाबा संस्‍थानमधील  दिव्‍यांग कर्मचारी उपस्थित होते.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रूग्‍णालये सुरेश टोलमारे यांनी केले तर आभार उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी मानले.

Recent News