श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाचे प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला व-हाडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साईभक्त श्री. वेंकटा सुब्रमण्यम, बॅंगलोर, कर्नाटक यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.