मा. ना. श्री. अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री, रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.