सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकवत आणि राष्ट्रगीत गायन करत भारताचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे आता जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. डोखे या अहमदनगर जिल्ह्याच्या सुपुत्री असून, त्यांनी यापूर्वीही महिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे.
या मोहिमेसाठी त्यांनी आज श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते डोखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते.
Undefined
माउंट एव्हरेस्टनंतर आता पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांचे लक्ष्य माउंट लोत्से! साईबाबांच्या चरणी घेतले आशीर्वाद.
Tuesday, April 8, 2025 - 22:00