Languages

  Download App

News

News

आज दि.१० सप्‍टेंबर २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात संस्‍थान आस्‍थापनेवरील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत सामावून घेणेचा  कार्यक्रम पार पडला.  यावेळी मा.ना.श्री राधाकृष्‍ण विखे पाटील, महसूल व दुग्‍ध विकास मंत्री यांच्‍या हस्‍ते प्रातनिधीक स्‍वरुपात १६ कर्मचा-यांना नेमणूक आदेश देण्‍यात आले.  याप्रसंगी मा.खा.डॉ सुजय विखे पाटील, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकिय अधिकारी, विविध विभागांचे विभागप्रमुख व कर्मचारी तसेच शासकिय अधिकारी, शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 

यावेळी मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्‍यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्‍यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब तसेच श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मा.तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा‍ न्‍यायाधीश मा.सुधाकर यार्लगड्डा साहेब व मा.तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिाकारी सिध्‍दाराम सालीमठ साहेब यांचे मिळालेल्‍या सहकार्याबद्दल आभार व्‍यक्‍त केले. 

मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्‍थान मध्‍ये सलग १० वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत कायम करणे, On Time Scheme राबविणेकामी संस्‍थान तदर्थ समितीचे मान्‍यतेने शासनाकडे प्रस्‍ताव पाठविण्‍यात आलेला होता. त्‍यास शासनाने दि.०५/०९/२०२४ रोजी मान्‍यता दिलेली असून तदर्थ समितीचे दि.०९/०९/२०२४ चे सभेतील निर्णयानुसार संस्‍थानमध्‍ये सलग १० वर्ष सेवा झालेल्‍या २७२६ कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थान मध्‍ये सामावून घेणेकामी  आवश्यक कार्यवाही करण्‍यात येत आहे.  

संस्‍थान अधिनियम २००४  अंमलात येण्‍यापुर्वी कार्यरत ५३० कंत्राटी कर्मचा-यांपैकी ३९६ पात्र     कर्मचा-यांना शै‍क्षणिक अर्हता व आकृतीबंधातील रिक्‍त पदांनुसार ५९ कर्मचा-यांना गट क व  ३३७ कर्मचा-यांना गट ड चे सरळ सेवेच्‍या पदांवर दि.१०/०९/२०२४ पासून संस्थान आस्थापनेवर सामावून घेण्यात येत आहे. रिक्‍त पदांअभावी शिल्‍लक राहीलेल्‍या ९४ कर्मचा-यांना टप्‍या-टप्‍याने रिक्‍त होणा-या पदांवर सामावून घेण्‍यात येणार आहे. 

तसेच संस्‍थान अधिनियम २००४ अंमलात येण्‍यापुर्वीचे शैक्षणिक अर्हता व रिक्‍त पदांअभावी शिल्‍लक कर्मचारी तसेच अधिनियम २००४ अंमलात आल्‍यानंतरचे उर्वरीत कंत्राटी कर्मचा-यांपैकी गट क व गट ड चे पदावर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्‍त कर्मचा-यांची स्‍पर्धात्‍मक परिक्षा घेऊन, त्‍यातील गुणानुक्रमानुसार रिक्‍त स्‍थायी पदांवर सामवून घेण्‍याची प्रक्रिया करण्यात येईल. याप्रमाणे समायोजन झाल्‍यानंतर उर्वरीत कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थानचे मंजुर आकृतीबंधातील कायम कंत्राटी पदांवर सामावून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीचे मान्‍यतेने प्रोत्‍साहन भत्‍ता, शॉप अॅक्‍ट नुसार रजा/सुटया व सध्‍या देण्‍यात येत असलेल्‍या इतर सवलती देण्‍यात येतील. याबरोबरच सध्‍या कार्यरत स्‍थायी गट ड पदांवरील कर्मचा-यांना मा.शासनाचे मान्‍यतेने तदर्थ पदोन्‍नती देऊन, त्‍यांची सेवाजेष्‍ठता संरक्षित करण्‍यात येणार आहे.

Recent News