श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात श्री.साईनाथ रुग्णालय येथे कॅन्सर Screening test शिबीर संपन्न...
दि.२२ जुन २०२४ ते दि.२४ जुन २०२४ रोजी स.०९.०० वा. श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांचेकरीता तोडांच्या व घशाच्या कर्करोग कर्करोग (Head and Neck) तसेच महिला कर्मचारी यांचेकरीता Breast Cancer Screening test या शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते. या शिबीराकरीता लुपीन कंपनीने मोफत Screening test चे मशिन उपलब्ध करुन दिले होते. सदर Screening test शिबीराकरीता ०३ दिवसात सुमारे ४१८ कर्मचारी यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ३१८ कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
सदर शिबीराचे उद्घाटन श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी बोलताना श्री गाडीलकर म्हणाले की, श्री साईबाबा संस्थानमधील सर्वच कर्मचारी यांची टप्प्याटप्प्याने Cancer Screening test करणेत येणार आहे. कर्मचारी बांधवानी सदरील तपासणी शिबीराचा घाबरुन न जाता Cancer Screening test करावी या तपासणीमधुन निदान झालेल्या कर्मचा-याला कॅन्सरशी लढताना संस्थान पुर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तरी संस्थान मधील कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची नियमीतपणे काळजी द्यावी कर्मचा-यांकरीता असेच तपासणी शिबीरे यापुढेही केली जातील.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कॅन्सर तज्ञ डॉ.मुकुल घारोटे, लुपीन कंपनीचे पंकज घुगे राहुल गुप्ता,अपर्णा (जीनवाल) जाधव. डॉ.संपदा दाभाडे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष यांचा सह रुग्णालयातील सर्व कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले, सुत्रसंचालन सुरेश टोलमारे,जनसंपर्क अधिकारी यांनी केले तर मान्यवरांचे आभार डॉ.प्रितम वडगावे प्र.वैद्यकीय संचालक यांनी मांडले .