Languages

  Download App

News

News

आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत  सुरु करणेत आलेल्‍या सशुल्‍क दर्शन पास वितरण प्रणाली कियॉस्‍क मशिन  सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी  बाळासाहेब कोळेकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले. सदर कियॉस्‍क मशिनव्‍दारे साईभक्‍तांना स्‍वतः सशुल्‍क दर्शन पास काढता येणार आहे. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्‍वनाथ बजाज, उपकार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्र. विभाग प्रमुख अनिल शिंदे, प्रविण मिरजकर, आय. टी. विभागाचे संजय गिरमे व TCS कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Recent News