श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने शिर्डी येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती प्रियांशी अक्षय खुल्लर यांनी श्री साईचरणी ७० हजार २५० रुपये किंमतीचे ७०९.६०० ग्रॅम वजनाचे आकर्षक ताट अर्पण केले.