आज गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत सुरु करणेत आलेल्या आरती/दर्शन पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, प्र. विभाग प्रमुख अनिल शिंदे, प्रविण मिरजकर, विजय मते, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्निल गायकवाड, आय. टी. विभागाचे संजय गिरमे व TCS कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.