Languages

  Download App

News

News

शिर्डी-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथे लाखो साईभक्त श्री साईबाबांचे दर्शनासाठी येत असतात. साईबाबांविषयी भाविकांना सखोल माहिती प्राप्त व्हावी यासाठी संस्थानने अनेक प्रकारचे विविध भाषेत साईबाबांचे जीवनकार्य व संस्थानचे विविध उपक्रम याविषयी प्रकाशने प्रकाशित केलेले आहे. प्रकाशित साहित्यांचे पुनर्मुद्रण / निर्मिती प्रेसधारकांना छपाईकामी दिलेले पुस्तके, दैनंदिनी/दिनदर्शिका वगैरे नमूने छपाई करून प्राप्त झालेनंतर ते संस्थानने पुरविलेल्या साहित्याप्रमाणे आहेत किंवा नाही? यासाठी बारकाईने तपासणी करणे व सुधारणा / दुरुस्ती सुचविणे तसेच प्रकाशित केलेल्या सर्व प्रकाशनात काहि त्रुटी राहु नये याहेतुने श्री साईसच्चरित ग्रंथाचे सखोल अभ्यासक व विविध भाषेचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली, ओरिया, गुजराथी, आसामी, पंजाबी, सिंधी, उर्दू, नेपाळी इ.) प्रत्येकी एक ते तीन तज्ञ व्यक्ती की जे संस्थानला विनामुल्य सेवा देतील अशा साईभक्तांचा पॅनेल (मंडळ) तयार करणे प्रस्तावीत असुन याकरीता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जाहीर आवाहन केलेले आहे.

याकरीता पुढील पात्रतेच्या अभिव्यक्ती स्वारस्यअसलेल्या भाविकांकडून आवेदन पत्र मागविण्यात येत आहेत. आवेदन करु इच्छीणारे साईभक्त हे श्री साई सच्चरित ग्रंथाची सखोल व गाढे अभ्यासक, स्वत: लेखक, अनुवादक अथवा साईबाबांविषयी तसेच, विविध धार्मिक, आध्यात्मिक पुस्तकांचे लेखनाचा अनुभव असलेले, संबंधीत भाषेमध्ये पी.एच.डी. केलेली किंवा विद्यापिठाचे प्राध्यापक असल्यास प्राधान्य राहील व या क्षेत्रातील २० ते २५ वर्षाचा दिर्घ अनुभव असावा. तसेच साईभक्त पॅनेल (मंडळ) कामाचे स्वरुप पुढील प्रमाणे राहिल. संस्थानप्रकाशित साहित्यांची पुनर्मुद्रण / निर्मिती साईभक्तांना उपलब्ध करुन देतांना प्रेसधारकांना छपाईकामी दिलेले  पुस्तके, दैनंदिनी/दिनदर्शिका वगैरे नमूने छपाई करून दिलेनंतर ते संस्थानने पुरविलेल्या साहित्याप्रमाणे आहेत किंवा नाही? यासाठी बारकाईने तपासणी करणे व सुधारणा / दुरुस्ती सूचविणे, शुध्दलेखन व व्याकरण याची योग्यरित्या पडताळणी करणे, मुद्रित शोधन (Proof Reading) करणे, साईभक्तांमार्फत उपस्थित करणेत येणा-या मुद्दयांचे / शंका निरसन करणेकामी संस्थानला मार्गदर्शन व स्पष्टीकरण देणे.

याबाबतचे आवेदन पत्र संस्थानच्या प्रकाशने विभागाचे publication@sai.org.in या ई-मेल आयडीवर सादर करावे.  याबाबत अधिक माहितीसाठी (०२४२३)२५८८००/०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आलेले आहे.

 

Recent News