Languages

  Download App

News

News

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या साईभक्तांसाठी संस्थानमार्फत ५ लाखाचे विमा कवच

 

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन तसेच विविध खाजगी अथवा सार्वजनीक वाहनांनी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. अशा साईभक्तांसाठी ते घरातून निघून शिर्डी येथे पोहचेपर्यंत वाटेत काही दुर्दैवी घटना घडल्यास ५ लाखाचे विमा कवच संस्थानतर्फे जाहिर करण्यात आले आहे.

 

शिर्डी येथे विविध ठिकाणाहून पदयात्रेव्दारे साईबाबांची पालखी घेऊन येणा-या साईभक्तांची संख्या मोठी आहे. पायी प्रवासाने शिर्डी येथे येतांनी काही दुर्दैवी घटना घडल्यास अशा दुर्घटनाग्रस्त साईभक्त किंवा त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु लाभ मिळण्यासाठी शिर्डी येथे येणा-या पालखी मंडळाने आपल्या मंडळाचे नाव त्यात सहभागी होणा-या व्यक्तींची नावे आधार क्रमांकासह संस्थानकडे अधिकृतरित्या नोंद केलेली असणे आवश्यक आहे.

 

त्याचप्रमाणे खाजगी अथवा सार्वजनीक वाहनांनी शिर्डी येथे येतांना काही दुर्दैवी घटना घडल्यास अशा साईभक्तांनाही या विमा कवचचा लाभ मिळणार आहे. मात्र या साईभक्तांना श्री साईबाबा संस्थानमार्फत पुरविल्या जाणा-या ऑनालईन भक्तनिवास रुम बुकींग, व्हीआयपी आरती पास / दर्शन पास / सत्यनारायण पुजा पास /अभिषेक पुजा पास यापैकी एखाद्या सुविधेसाठी अगाऊ नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशी नोंदणी केलेल्या कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुष साईभक्तांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

शिर्डीला येतांना रस्त्यात दुर्दैवी घटना झालेल्या साईभक्तांच्या वारसांना या विमा पॉलीसीतून ५ लाख रुपये एवढी रक्कम अपघाती विमा म्हणून मिळणार आहे. सर्व साईभक्तांनी व पालखी मंडळांनी या योजनेची नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

Recent News